रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : गेल्या मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेत दहावी सरस्वती विद्या मंदिर रावेर चा विद्यार्थी अभय विजय खैरे याने दहावीत 92.80 गुण मिळवले होते. आणि विशेष बाब म्हणजे या पठ्ठ्याने विज्ञान विषयांमध्ये चक्क 100 पैकी 100 गुण मिळवत प्रावीण्य प्राप्त केले. या निमित्ताने दिनांक 13 जानेवारी रोजी सरस्वती विद्यामंदिर रावेर येथे उद्योजक श्रीराम पाटील व भावी खासदार डी.डी. वाणी यांच्या हस्ते अभय विजय खैरे याचा विशेष सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
यावेळी शिव प्रतिष्ठान चे अशोक शिंदे, जयंत कुलकर्णी सर व सर्व सन्मानिय सदस्य, तसेच कामगार नेते दिलीप कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे,सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक राजकुमार जैन सर, उपमुख्याध्यापक मोहन भागवत बारी सर , सागर पवार सर, नितीन पाठक सर, मॅडम अनीता सपकाळे, राणे मॅडम, ऊषा चव्हाण मॅडम व अश्विनी गाढे मँडम, आदि मान्यवर व शिक्षक वृंद उपस्थित होते.


.jpg)