मांगलवाडी, तांदलवाडी तसेच सुनोदा व इतर काही गावांच्या कोळी समाजाच्या आ.चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतल्या समस्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


 रावेर ( विनोद हरी कोळी) : आज दिनांक 15 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी रावेर तालुक्यातील मांगलवाडी या गावात कोळी समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची सभा घेण्यात आली. सभा दरम्यान अध्यक्षस्थान आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. सर्वप्रथम मांगलवाडी गावाचा पुनर्वसन संदर्भात प्रश्न सोडविण्यात आला लवकरात लवकर पुनर्वसन संदर्भ प्रश्न मार्गी लावू अशी आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच आदिवासी कोळी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सर यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले. [ads id="ads1"]

         तसेच ST जातीच्या दाखल्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी, लवकरात लवकर सोडविण्यात येतील, शबरी योजना, तसेच मुलांच्या शिष्यवृत्ती विषयी प्रश्न इत्यादी सर्व प्रश्न लवकरात लवकर आपण मार्गी लावू असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. तसेच मुक्ताईनगर येथे महर्षी वाल्मिकी सभागृह आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आले वाल्मिकी सभागृहाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गाने आहे .तसेच ऐनपूर , निंबोल गावात प्रत्येकी 25 लाखाचे सभागृह आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपले आमदार निधीतून मंजूर केले आहे.[ads id="ads2"]

रावेर मुक्ताईनगर मतदारसंघातील कोळी समाजातील लोकांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे योगदान फार मोलाचे ठरले आहे, असे यावेळी सर्व कोळी बांधवांकडून म्हटले जात आहेत. 

यावेळी त्या ठिकाणी उपस्थित नायब तहसीलदार संजय तायडे, रावेर येथील विस्तार अधिकारी शिंदे साहेब ,शिवसेनेचे कट्टर समर्थक व संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष छोटू पाटील, कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर, गाते येथील सुनीताताई तायडे ,चंद्रकांत कोळी ,सोपान आप्पा सपकाळे ,जिल्हा महासचिव मनोहर कोळी, हरिलाल कोळी कांडवेल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सर सुनोदा, आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका अध्यक्ष योगेश्वर कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश कोळी, गंभीर उन्हाळे ,नारायण कोळी, राहुल कोळी ,संदीप महाले, ईश्वर तायडे ,भागवत कोळी ,निंबोल येथील विनोद कोळी, किशोर कोळी, मंगलवाडी सरपंच कमलबाई बोरसे ,पोलीस पाटील दीपक ताय,डे तसेच रावेर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज कोळी बांधव त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!