हिंदू - मुस्लिम याचा जातीय तालुका कौतुकास्पद परंतु नगरपालिकेचे 'अक्षम्य' दुर्लक्ष
यावल ( सुरेश पाटील ) : यावल नगरपालिका संपूर्ण कार्यक्षेत्रात जागोजागी आणि मुख्य रस्त्यावर खोलगट खड्डे, बेकायदा गतिरोधक,रस्त्यावर मातीचे उंच गतिरोधक,बुरुज चौकाजवळ सिमेंट काँक्रीटचे बेकायदा गतिरोधक निर्माण झाले असून या विविध ठिकाणी दररोज अंदाजे २० ते ३० हजार हिंदू मुस्लिम व इतर सर्व स्तरातील बांधवांची मोठ्या प्रमाणात वाहनांसह वर्दळ सुरू असते गतिरोधकांच्या ठिकाणी प्रत्येकाला थांबून नतमस्तक व्हावे लागते ही मोठी लाजिरवाणी गोष्ट असल्याने एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडू शकते याकडे यावल नगरपरिषदेसह काही संघटना काही लोकप्रतिनिधी आणि काही संबंधित अधिकाऱ्यांचे 'अक्षम्य' दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल शहरातील नागरिकांकडून होत आहे.[ads id="ads1"]
यावल शहरात बुरूज चौकापासून मुख्य रस्त्यावर जागोजागी आणि गल्लीबोळात सुद्धा जागोजागी बेकायदा गतिरोधक आणि रस्त्यावर खड्डे व गतिरोधकासारखे उंच भाग निर्माण झाले आहेत बऱ्याच ठिकाणी बांधकाम साहित्य पडून आहे,बोरावल दरवाजाकडून भुसावलकडे जाताना जुन्या नाक्याजवळ अपघातास निमंत्रण देणारा भर रस्त्यात आडवी खोल चारी पडली त्या ठिकाणी पाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे नुकताच त्या ठिकाणी एक किलोमीटर अंतराचा बोगस सिमेंट काँक्रीटचा रोड आणि गटारी तयार झाल्या आहेत इत्यादी सर्व कामांकडे यावल नगरपालिकेचे, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, हिंदू मुस्लिम बांधवांचा जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था अबाधित असली तरी वरील बेकायदा अनधिकृत गतीरोधकांमुळे एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू शकते. [ads id="ads2"]
या मुख्य रस्त्यावरून सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी कायद्याचे ज्ञान असणारे जाये करीत असतात परंतु प्रत्यक्षात कोणी कारवाई करायला तयार नाही याकडे यावल नगरपालिका संबंधित काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी वेळीच लक्ष केंद्रित करून सार्वजनिक रस्त्यावर येणारे अडथळे तात्काळ दूर करावे अन्यथा पुढील कारवाई संबंधित सर्व यंत्रणात जबाबदार राहील असे गृहीत धरावे.


