यावल (सुरेश पाटील)
यावल आगारात आज बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ चालक दिवस साजरा करण्यात आला.यावेळी सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे सर प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.यावेळी आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी तसेच प्रमुख उपस्थित पाहुणे यांनी चालकांचा सत्कार केला.[ads id="ads1"]
आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी चालकांना अपघात सुरक्षितता बाबत मार्गदर्शन केले तसेच के.पी.टी.एल. वाढवण्याबाबत आवाहन केले . यावेळी वाहतूक निरीक्षक वानखेडे,सोनवणे तसेच आगारातील चालक,वाहक तसेच प्रशासकीय कर्मचारी वाहक,चालक उपस्थित होते.


