कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोखा नावाखाली अन्याय
यावल (सुरेश पाटील)
यावल शहरात आज बुधवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता यावल नगरपालिकेने यावल शहरात ठिकठिकाणी लावलेले भगवे झेंडे,बॅनर अग्निशमन वाहन फिरवून काढून घेण्याचा निर्णय अचानक घेतल्याने आणि मेन रोडवर गवत बाजारापासून प्रत्यक्षात कारवाई सुरू केल्याने यावल शहरातील नागरिकांमध्ये मोठे आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत नगरपालिकेकडून माहिती घेतली असता पोलिसांच्या आदेशानुसार झेंडे काढण्याची कारवाई सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.[ads id="ads1"]
यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यात पोलीस दलाला भगव्या झेंड्याची ऍलर्जी झाली का..? तसेच कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोख्याच्या नावाखाली भेदभावात्मक आदेश काढल्याने मात्र नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
अयोध्या नगरीत दि.२२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम प्राण प्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.आणि यानिमित्त संपूर्ण भारत देशात,राज्यात, शहरात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात भगव्या पताका, बॅनर लावून श्रीराम प्राणतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावल येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठे निमित्त ऐतिहासिक अशी भव्य शोभायात्रा मिरवणूक सुद्धा काढण्यात आली.यावेळी यावल पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर यावल शहरातील काही रावणासारख्या राक्षसी प्रवृत्तीने मिरवणुकीनंतर पाठीमागे इस्लाम जिंदाबादच्या घोषणा दिल्या या घोषणा घोषणा म्हणजे शोभा यात्रेला विरोधच केला गेला का.? घोषणा देण्यामागचे कारण काय..? एक दिवस आधी शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती त्यात सूचना दिल्यानंतर सुद्धा अशा घोषणा दिल्या गेल्या याला काय म्हणावे..? यावल शहरात अवैध धंदे यांच्याशी संबंधित असणाऱ्यांवर आणि समाजकंटकांवर यावल पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही का..? इतर अनेक बेकायदेशीर दैनंदिन धंदे मोठ्या प्रमाणात आणि आवाजात सुरू आहेत त्याचा त्रास नागरिकांना होत नाही का..? याचे आत्मपरीक्षण कोण करणार..? सकाळी ५:४५ वाजेपासून दिवसभर गल्ली बोळात मोटरसायकल इतर वाहनांच्या माध्यमातून वाहनांवर बेकायदा,बिना परवाना स्पीकर लावून आपापल्या वस्तूची जोरजोरात घोषणा / जाहिरातबाजी करून बेकायदा विक्री करून नागरिकांना हैराण करण्याचे दैनंदिन कृत्य सुरू आहे याकडे पोलीस केव्हा लक्ष देतील..? याबाबत शासनासह सुप्रीम कोर्ट,मुंबई,औरंगाबाद हायकोर्ट यांनी काही निर्देश दिले आहेत त्यांचे पालन केले जात का..? [ads id="ads2"]
जिल्ह्यात काही एक दोन ठिकाणी किरकोळ वाद निर्माण झाले होते आणि आहे त्याचे निमित्त साधून आणि कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोखा कायम राहावा म्हणून जिल्हास्तरावरून यावल शहरातील भगवे झेंडे काढून घेण्याचे आदेश कोणी कोणाला दिले होते..? आणि आहे..? आणि याबाबत लेखी आदेश संबंधित सर्व यंत्रणेला प्राप्त झालेले आहेत का.? किंवा तोंडी आदेश दिले..का ? याबाबत आणि यावल शहरात जर हिंदू - मुस्लिम बांधवांचा जातीय सलोखा कायम आहे तर भगवे झेंडे काढण्याचा उद्देश काय..? भगवे मय वातावरण कोणाला सहन होत नाही का..? याबाबत जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष केंद्रित करून यापुढे असे भेदभावात्मक कृत्य जिल्हास्तरावरून व्हायला नको याची दक्षता बाळगावी असे यावल शहरासह तालुक्यातून सर्व स्तरातून बोलले जात आहे.


