यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद : आश्रय फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

यावल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येत बेरोजगार विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मुलाखती देऊन उत्तम प्रतिसाद दिला. शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यात मोठया संख्येत बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंम्पनीच्या व्यवस्थापिक मंडळास मुलाखती दिल्या असुन यातील काही गरजुंना जागेवरचं नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते.[ads id="ads1"]

        शहरात फैजपूर रस्त्यावर जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जळगाव जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर,जळगाव यांच्या विद्यमाने करण्यात आले होते सकाळ पासुन या मेळाव्या करीता जिल्ह्याभरातुन तरूणांनी उपस्थिती दिली होती.[ads id="ads2"]

मेळाव्यापुर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या तर मेळाव्याचे उद्घघाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे,यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,कौशल्या विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे,श्रीकांत लांबोळे, आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉ. पराग पाटील,कौशल्य विकास मंत्रालय मुबंईचे प्रतिनिधी दिनेश बारेला,अरुण ठाकरे, सुभाष कदम,महेश चौधरी, दिपक बोरसे,उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरणार,उपप्राचार्य अर्जुन पाटील,प्रा.सी.के. पाटील,प्रा.आर.एस.तडवी,प्रा. ए.जी.सोनवणे,प्रा.इ.आर. सावकार, प्रा.एम.एच.पाटील, प्रा.एस.व्ही.कदम,प्रा.आर. एस. थिगळे,प्रा.नंदकिशोर बोदडे,प्रा डॉ.संतोष जाधव, प्रा. सी.के.वसाने,सागर लोहार,मनोज बारीसह महाविद्यालय चे शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.मोठया संख्येत विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती या रोजगार मेळाव्यात ६९४ च्या वर रिक्तजागे करीता जळगाव जिल्ह्यातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड बाबा राजपूत,हिताची अष्टमी इंडिया हितेश नन्नवरे,जैन फार्म फ्रेश फड्स भीकेश जोशी,सुप्रीम इंडस्ट्रीज,क्रेडिट एक्सेस ग्रामीण राजू पाटील, स्टार फेब्रीकेटर्स कॅटर्स एम आय. डी.सी.जळगाव,सिग्मा फॅसिलिटी जळगाव सचिन पवार,एल.आय.सी.ऑफ इंडिया जळगाव जितेंद्र सैदाने, राईट सिस्टीम अँन्ड सॉफ्टवेअर जळगावचे मंदार व्ही शांडिल्य, आय. टी.एम.जळगाव अविनाश भडाने,समर स्टील इंडस्ट्रीज या कंपन्याचे प्रतिनिधींनी उपस्थित तरूणांच्या मुलाखती घेतल्या यातील काही गरजु उमेदवरांना जागेवरच नियक्तीपत्र देण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!