ऐनपूर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील  करिअर मार्गदर्शन केंद्रा अंतर्गत उच्च शिक्षणातील वाटा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भुषविले. [ads id="ads1"]

  तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दिपाली वाय. किरंगे (के.सी. ई चे व्यवस्थापन व संशोधन संस्था जळगाव) यांनी पदवीनंतर उच्चं शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध कोर्सेस की ज्यामध्ये आपल्याला मध्ये करिअर करता येते याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक डॉ.संदीप घोडके  (के.सी. ई चे व्यवस्थापन व संशोधन संस्था जळगाव) यांनी पदवीनंतर उच्चं शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध कोर्सेसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षा बद्दल माहिती देताना प्रवेश अर्ज कसा भरावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून सांगितले.[ads id="ads2"]

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले. या कार्यक्रमाला तृतीय वर्ष कला व विज्ञान शाखेचे एकूण ५६ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  अध्यक्षीय समारोपत प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना परंपरागत शिक्षणाचा मागे न धावता नवीन कोर्सेस निवडून आपले करिअर घडवता येईल असेल सांगितले. शेवटी  करिअर मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.व्ही.एन.रामटेके यांनी मान्यवरांचे आभार मानले व शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!