रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी पुंडलिक नगरे वाघोड येथील माध्यमिक विद्यालयात शिकत असतांना येथील शिक्षक श्री पी एम महाजन सर यांचे ते शिस्त प्रिय विद्यार्थी होते. [ads id="ads1"]
गुरु आणि शिष्य यांचं त्या काळातील नातं हे अत्यंत आगळ वेगळं होत. श्री नगरे यांचं निधन झाल्यावर काही दिवसातच श्री महाजन सर यांचे देखील निधन झाले होते. म्हणून सदर पाणपोई दोघांच्या स्मरणार्थ म्हणजे " गुरु शिष्य " अश्या नावाने पाणपोई सुरु करण्यात यावी अशी संकल्पना ऍड विजय महाजन यांनी बोलून दाखविली.[ads id="ads2"]
त्याला नगरे परिवाराने संमती दिल्याने आज दि 22 रोजी रावेर तहसीलदार बंडू कापसे, बोदवड तहसीलदार मयूर कळसे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मित्रवर्य डॉ संदीप पाटील तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते.





