रावेर (राहुल डी गाढे) जीनियस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल रावेर येथे 7 th annual function program मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती व गजानन महाराजांच्या फोटोचे पुजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर चे नायब तहसीलदार श्री. मयुर कळसे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर भाऊ महाजन, रावेर पंचायत समिती,शिक्षणाधिकारी शैलेंद्र दखने, डॉ. संदिप पाटील, डॉ. भगवान कुयटे, केंद्रप्रमुख गणेश धांडे , मा. नगराध्यक्ष श्री. शितल पाटील, चेअरमन लक्ष्मी केला एजन्सी संजय अग्रवाल, डॉ. योगिता पाटील , डॉ. सुचिता कुयटे, सौ. संगिता अग्रवाल हे होते. कार्यक्रमाची सुरूवात श्री.गणेशाच्या गाण्याने करण्यात आली.
पहिल्याच गाण्याने उपस्थित असलेले पालक,विद्यार्थी,प्रमुख पाहुणे हे भारावून गेले.तसेच शाळेतील विद्यार्थांनी,चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत, डेमो, पथनाट्य, जनजागृती पर नृत्य इ. गाण्यान वरती ताल धरून उपस्थितांचे मन जिंकले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत झटकार सरांनी विद्यार्थांना संबोधन करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता झटकार मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा,आणि संस्थेचे कार्य प्रास्ताविकात मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. महेश सावळे यांनी केले. तर आभार श्री.दिपक झटकार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


