रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास सर्व बौद्ध उपासक यांच्या वतीने सर्व प्रथम त्रीशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले. व नामांतर लढ्यातील शहीद झालेल्या शाहिदांना आदरांजली वाहण्यात आली.[ads id="ads1"]
त्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, मा. नगरसेवक योगेश गजरे, मा. नगरसेवक जगदीश घेटे, राष्ट्रीय नेते दिलीप कांबळे, एस. टी. महामंडळचे संदीप तायडे प्रा. सी. पी. गाढे, सोनू तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहर अध्यक्ष तथा संपादक राहुल डी गाढे, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहर शाखा सचिव विशाल तायडे, धनराज घेटे, विकास अटकाळे, निळे निशाण कामगार संघटना पदाधिकारी अजय मध्ये, गौतम गजरे, प्रमोद सोनवणे, चेतन घेटे, मुन्ना शर्मा, अतुल घेटे, उमेश अढागंळे यांच्यासह आदी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



