मुक्ताईनगर तालुक्यातील विधवा, दिव्यांग, वृद्ध यांची संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना अंतर्गत १०४९ पात्र

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 मुक्ताईनगर ( प्रशांत गाढे) : तालुक्यातील विधवा, दिव्यांग, वृद्ध यांची संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना अंतर्गत १०४९ पात्र लाभार्त्याना मा.आ.चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली संजय निराधार समिती मुक्ताईनगर यांनी मंजुरी दिली. आजवर पाच हजार पेक्षा जास्त पात्र लाभार्त्याना समितीने मंजुरी दिलेली आहे. [ads id="ads1"]

 मा.आ.चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला आर्थिक साहाय्य मिळत आहे. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जास्तीत जास्त लाभार्त्याना लाभ मिळणेकामी वैदकीय दाखला व दिव्यांग प्रमाणपत्र मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथेच मिळावे अशी व्यवस्था केली त्यामुळे गरजू लाभार्थी तालुक्याच्या ठिकाणीच सर्व कागदपत्रे मिळत असल्यामुळे त्यांची भटकंती थांबलेली आहे. [ads id="ads2"]

  प्रकरण मंजुरीसाठी समिती अध्यक्ष अनंतराव देशमुख, सूर्यकांत पाटील, मोहन बेलदार, पंकज पांडव, उमेशभाऊ पाटील, जाफर अली, पुंडलिकभाऊ सरस, रमेश महाजन, लीलाधर पाटील, नीलिमा देवानंद वंजारी,  तहसीलदार वाडे साहेब हे काम पाहत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!