ऐनपूर येथे आज पासून श्री रामायण महापुराण कथा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

ऐनपूर ता. रावेर - येथे आज दि. १५ जाने. पासून श्री रामायण महापुराण कथा व अखंड हरिनाम संकिर्तनसप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कथा वाचक तथा व्यासपिठ नेतृत्व ह.भ.प. श्री भालचंद्र महाराज देव (केज जि. बीड ) हे करणार असून या सप्ताहात ह.भ.प.  सुनिल महाराज ( कर्की ) , ह.भ.प. नामदेव महाराज ( नेहेता ) ,[ads id="ads1"] ह.भ.प. नारायण महाराज ( भामलवाडी ) , ह.भ.प १००८ महंत श्री कृष्ण चैतन्य जी महाराज मठाधीपती मंठा , ह.भ.प. तुकाराम महाराज ( श्री यज्ञेश्वर आश्रम मेहूण ) , ह.भ.प. अनिल महाराज दातार (निफाड जि. नाशिक ) ,ह.भ.प. डॉ. विनित महाराज ( आडगांव ) यांच्या किर्तन सेवा तसेच ह.भ.प. भालचंद्र महाराज देव (केज जि. बीड ) यांचे काल्याचे किर्तन व दि. २२ जाने . रोजी रात्री ह .भ. प. विठ्ठल महाराज ( वाघाडी ) यां चा भारुडाचा कार्यकमआयोजित करण्यात आला आहे तरी पंचकोशी तील समस्त भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!