यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रा.पं.मधील आर्थिक अपहाराबाबत औरंगाबाद खंडपीठाकडून संबंधितांना नोटीस

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


तक्रार,उपोषण,आंदोलनाला न जुमानणाऱ्या प्रशासनाला कायदेशीर दणका

यावल ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायत मधील आर्थिक अपराबाबत लेखी तक्रार त्यानंतर उपोषण, लक्षवेधी आंदोलन करून सुद्धा यावल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जळगाव यांनी कारवाई न केल्याने तक्रारदार शेखर सोपान पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात न्याय मागितल्याने औरंगाबाद खंडपीठाकडून संबंधित यंत्रणेला नोटीस काढल्याने जिल्हा परिषद,पंचायत समिती, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]

     याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायत कार्यालयात सन २०२० ते २०२३ या कालावधीत सावखेडासिम ग्राम पंचायत कार्यालयाचे तत्कालीन सरपंच व निवृत्त ग्रामसेवक यांनी संबंधित यंत्रणेशी हातमिळवणी करून ग्राम पंचायत कार्यालयाला प्राप्त झालेल्या १५ वित्त आयोग निधी,ग्रामनिधी व गावातील जनतेने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केलेला पाणीपुरवठा निधी,ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच व निवृत्त ग्रामसेवक यांनी इतर लोकांच्या मदतीने उपरोक्त निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला.[ads id="ads2="]

असल्याबाबत पंचायत समितीचे गटनेते तथा पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांनी यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती परंतु यावल पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनीतक्रारीची दखल न घेतल्याने शेखर सोपान पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन न्याय मिळण्याची मागणी केली होती आणि आहे त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने तक्रारीची दखल घेत मंगळवार दि.१६ जानेवारी २०२४ रोजी पिटीशन मध्ये सुनावणी घेऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या.मंगेश एस.पाटील व न्या.शैलेश पी.ब्रम्हे यांनी प्रतिवादी सरकार पक्ष,पोलीस अधीक्षक

जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)जळगाव यांना नोटीस जारी केली.तक्रारदार शेखर सोपान पाटील यांची बाजु विधिज्ञ वकील सुधीर तेलगोटे यांनी मांडली त्यांना विधिज्ञ अनिल सपकाळे यांनी सहकार्य केले,औरंगाबाद खंडपीठ संबंधितांना नोटिसा काढल्याने जिल्हा परिषद जळगाव पंचायत समिती यावल आणि संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!