यावल (सुरेश पाटील)
यावल पश्चिम वनक्षेत्रातील वाघझिरा तथा हरिपुरा वनपाल पथकाला यावल तालुक्यातील कोरपावली रस्त्यावर १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा आडजात लाकडाचा एकाच ठिकाणी मोठा साठा आढळून आल्याने पुढील कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध सागवानी व अवैध आडजात लाकूड व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
आज गुरुवार दि.१८जानेवारी २०२४ रोजी गुप्त बातमीवरून वनपाल वाघझीरा तथा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा वाघझिरा राउंड स्टाफ सह यावल तालुक्यातील दहिगाव येथे दहिगाव कोरपावली कच्च्या रस्त्यावर तपासणी केली असता अवैध इंजायली लाकूड साठा आढळून आला.जप्त मुद्देमाल इमारती नग ९३ घ.मी.१२.२१५,पंचरास जळाऊ थप्पी ११- घ.मी.११५.५१२ एकूण माल किंमत १३४०३१ रु. सदर गुन्ह्याबाब वनपाल हरीपुरा यांनी प्र.री.क्र.१/२०२४ दि.१८/१/२०२४ चा जारी केला असुन [ads id="ads2"]सदरची कार्यवाही ही यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघझिरा व अतिरिक्त कार्यभार वनपाल हरीपुरा येथील विपुल.दि.पाटील,वनरक्षक हनुमंत सोनवणे,सरला भोंगरे,अश्रफ तडवी,अक्षय रोकडे यांनी कारवाई केल्याने अवैध सागवानी व अवैध अर्जात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


