यावल (सुरेश पाटील)
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा यावल तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष आणि यावल तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायत ग्रामसेवक मजीत तडवी यांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी निलंबन आदेश काढले आणि निलंबन आदेश काढल्यानंतर सुद्धा ग्रामसेवकाने ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांसह माजी पं. स.सदस्या आणि तक्रारदार महिला सरपंच मीनाताई तडवी यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तसेच आज यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना बोरखेडा ग्रामपंचायतच्या महिला सदस्या आणि ग्रामस्थ तसेच परसाडे येथील सरपंच आणि ग्रामस्थ तक्रारी संदर्भात भेटण्यास आले असता बीडिओ यांच्या केबिन समोर एक तास उभे राहावे लागले यामुळे तसेच गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचे समोरीत सुनावणी दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पारित निकाल दि.३० नोव्हेंबर २०२३ अन्वये मंजिल अरमान तडवी ग्रामसेवक ग्रामपंचायत परसाडे ता.यावल यांना निलंबीत करणे बाबत संदर्भ क्र १ नुसार आदेशीत करण्यात आलेले आहे.ग्रामसेवक तडवी यांनी ग्रामपंचायत परसाडे ता. यावल येथे कार्यरत असतांना १) ग्रामनिधी,पाणी पटटीची वसुल केलेली रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खाती न भरणे २) १५ वा वित्त आयोग योजनेचे दप्तर,लेखे तपासणी कामी उपलब्ध करुन न देणे ३) सरपंच ग्रामपंचायत परसाडे यांना विश्वासात न घेता त्यांचे डिएस.सी.चा वापर करणे ४) पंचायत समिती स्थरावरील ग्रामसेवक यांच्या मासीक / पाक्षिक सभेस गैरहजर राहणे ५) ग्रामपंचायतीचा मासीक प्रगती अहवाल माहे सप्टेंबर २०२३ ऑक्टोबर २०२३, नोव्हेंबर २०२३ सादर न करणे ६) १४ वा वित्तआयोग व पेसा अंतर्गत केलेल्या कामांची तांत्रीक मान्यता दप्तरी उपलब्ध नसणे तसेच मत्ता नोंद रजिस्टर तपासणी कामी उपलब्ध करुन न देणे ७) वारंवार लेखी स्वरूपात नोटीस देऊनही खुलासा सादर न करणे
८) वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे याबाबी लक्षात घेता आपले वागणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही.आपण या कार्यालयास अडचणीत आणणेचा प्रयत्न केलेला आहे.व जाणुन बुजुन शासकीय कामात हलगर्जीपणा करुन आपल्या कर्तव्यात कसुर केलेला आहे.त्यामुळे उपरोक्त बाबीस आपणास जबाबदार धरण्यात येत आहे.
त्यामुळे आपण महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ च्या कलम ३ चा भंग केलेला असल्याचे सिध्द होत आहे यास्तव महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कार्यवाहीस पात्र ठरतात करीता मजितं अरमान तडवी ग्रामसेवक परसाडे ता. यावल यांनी ग्रामपंचायतीच्या
दैनंदीन कामकाजातील अनियमिततेचे गार्भीय विचारात घेता तडवी यांना जिल्हा परिषद सेवेतुन निलंबीत करावयाच्या निष्कर्षा पावेतो या कार्यालयाचे मत झालेले आहे.त्याअर्थी मी गट विकास अधिकारी पंचायत समिती यावल उपरोक्त वाचा क्र २ व ३ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये मजित अरमान तडवी ग्रामसेवक ग्रामपंचायत परसाडे यांना वरील प्रमाणे केलेल्या अनियमिततेचे गांभीर्य विचारात घेवुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील कलम ३ चे तरतुदीनुसार या आदेशान्वये दि. २६ डिसेंबर २०२३ पासून निलंबित केल्याचे आदेशित करीत आहे.असे दिलेल्या आदेशात यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी सौ मंजुश्री गायकवाड यांनी म्हटले आहे.
पत्रकार घेऊन आले का..?
माजी पंचायत समिती सदस्या तथा परसाडे ग्रामपंचायत सरपंच सौ.मीनाताई तडवी यांनी ग्रामसेवक तडवी यांच्या निलंबन आदेशाबाबत आणि निलंबन आदेश असताना ग्रामसभा घेतल्या बाबत गटविकास अधिकारी सौ. मंजुषा गायकवाड यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा करताना तुम्ही पत्रकार घेऊन आलात का..? असा प्रश्न विचारला असता उपस्थित पत्रकारांनी सांगितले की आम्ही माहिती घेण्यासाठी आलो माहिती घेणे चुकीचे नाही तुम्ही एक-दीड वर्षात पंचायत समिती कामकाजाबाबत विविध कार्यक्रमाबाबत सकारात्मक बातम्या दिल्या तरी का.असे उत्तर दिल्याने गटविकास अधिकारी या निरुत्तर झाल्या.


