डॉ.श्री.महेश सुनील महाजन हे M.Ch. Neuro Surgery या Super Speciality परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  (सुरेश पाटील)

टाकरखेडा तालुका यावल या छोट्याशा खेडे गावातील मुळचे राहिवाशी असलेले डॉ.महेश सुनील महाजन हे M.Ch. Neuro Surgery या super speciality परीक्षेत विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहेत.डॉ.महेश यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय,भुसावळ येथून तर M.B.B.S.नायर वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयातुन पुर्ण केलेले आहे.[ads id="ads1"]

M.S. Gen Surgery रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविदयालय.. अंबेजोगाई येथून प्रथम श्रेणित उत्तीर्ण केलेले असुन.डाँ.महेश महाजन हे NEET Super speciality परीक्षेत भारतातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कुटुंब समाज गाव तालुक्यासह जिल्हाचे नाव तेव्हा रोषण केले होते.[ads id="ads2"]

  त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आणि जी.बी. पंत हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे M.Ch. Neuro Surgery या Super speciality कोर्ससाठी प्रवेश मिळविला होता.नुकताच M.Ch. Neuro Surgery Super speciality निकाल लागला असुन..डाँ.महेश हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.

डॉ.महेश हे त्यांच्या राणे राजपूत समाजातील पहिलेच Neuro Surgeon असल्याने..स्वसमाजासह सर्वं स्तरातुन त्यांचे खूप खूप  कौतुक होत आहे.डॉ.महेश महाजन यांचा शैक्षणिक प्रवास हा विदयार्थ्यांना प्रेरणादायी असा आहे.डाँ.महेश हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भुसावळ येथे कार्यरत असलेले  सुनील रतन महाजन यांचे ते सुपुञ आहेत..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!