राजकीय प्रभावामुळे कारवाईस विलंब..?
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील कोसगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तत्कालीन सचिव हिम्मत श्रीपत पाटील यांना सेवानिवृत्तीनंतर देव असलेल्या रकमा थांबविण्यात याव्यात असे लेखी पत्र यावल येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी जळगाव जिल्हा सहकारी देखरेख संघ मर्यादित जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिल्याने विकासो सोसायटी क्षेत्रात मोठी खळबळ उडालीअसली तरी या प्रकरणात राजकीय प्रभावामुळे पुढील कार्यवाही विलंब होत असल्याचे सुद्धा सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
यावल येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी जळगाव जिल्हा सहकारी देखरेख संघ मर्यादित जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले लेखी पत्र प्रत्यक्ष बघितले असता तालुक्यातील कोसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तालुका यावल जिल्हा जळगाव यांचे कडून पीक कर्जाचा भरणा करून सुद्धा जेडीसीसी बँक पाडाळसे शाखेत थकबाकी यादीत नाव आल्या बाबतचे विषानुसार आणि तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडील आदेशान्वये तथा संदर्भान्वये दिलेल्या पत्रात पुढील प्रमाणे नमूद केले आहे.[ads id="ads2"]
जिल्हा उपनिबधंक सहकारी संस्था जळगांव यांचे कडील संदर्भिय पत्रा सोबत आपल्या संस्थेचे सभासद १ ) सौ. कोकीळाबाई मधुकर महाजन रा. कोसगाव २) भास्कर दामु महाजन रा कोसगांव ३) गिरधर वामन बेंडाळे रा.तालुका यावल कोसगांव यांचा विषयांकीत तक्रार अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला असुन सदर तक्रार अर्जात अर्जदार यांनी त्यांचे कर्जाचा भरणा सचिव कोसगांव यांचे कडे जमा केलेला असुनही यावल तालुक्यातील JDCC बॅक पाडळसे शाखेत थकबाकी यादीत नाव असल्याबाबतची लेखी तक्रार केलेली आहे.सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने या कार्यालयास सुनावणी ठेवली आलेली होती तसेच संदर्भ पत्र अर्जदार यांनी संस्थेचे तत्कालीन सचिव हिंम्मत श्रीपत पाटील यांनी सदर रकमांचा अपहार केल्याने त्यांचे सेवानिवृत्ती नंतर मिळणा-या रकामा मधुन वसुली करणे बाबतचा लेखी अर्ज या कार्यालयास केलेला आहे.तरी कोसगांव विविध कार्यकारी सहकारी संस्थेत झालेल्या आर्थीक व्यहारांची चौकशी होई पर्यंत संस्थेचे तत्कालीन सचिव हिंमत श्रीपत पाटील यांना सेवानिवृत्ती नंतर देय असलेल्या रकमा थांबविण्यात याव्यात असे पत्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांनी जळगाव जिल्हा सहकारी देखरेख संघ मर्यादित जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.या प्रकरणात जिल्हा व राज्यस्तरावरून राजकीय प्रभावामुळे पुढील कार्यवाही प्रलंबित असल्याचे सुद्धा राजकारणात,सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.


