सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- येथील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन उर्फ गजू नामदेव ठोसरे यांची भुसावळ कार्यक्षेत्रातील सावदा रेल्वे स्टेशनवर रेल्वे सल्लागार समिती सदस्य म्हणून नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
तसेच गजू ठोसरे हे सर्वांना सोबत घेऊन शहरात काम करतात त्यांचे स्वभावामध्ये सर्व समावेशकता दिसून येते.म्हणून त्यांची सदरील समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,यानिमित्ताने सावदा बस्टेशन परिसरात एका छोटेखानी कार्यक्रमात गजू ठोसरे यांचा पुष्पगुच्छ देऊन,[ads id="ads2"] समाजसेवक सोहेल खान,महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह व सावदा शहर अध्यक्ष फरीद शेख,दै.जळगाव वृत्तचे विभागीय प्रमुख फारुक शेख व दिलिप सोनवणे फैजपूर,मोईन खान,कालु भाई रिक्षा वाले इत्यादी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.