रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप, कॉंग्रेस तसेच जवळपास ५ सरपंच सह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे पक्षात प्रवेश केला.[ads id="ads1"]
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भव्य प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, जळगांव जिल्हाउपाध्यक्ष हकीम खाटीक, हाजी अत्ताउल्लाह खान, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेख, यावल माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्याक यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख, माजी नगरसेवक दिलीप वाणी, युवक तालुकाध्यक्ष राकेश भांगळे, इत्यादी उपस्थीत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दुपट्टा घालून स्वागत केले व मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
अनिल चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने व त्यांच्या नेतृत्वात प्रवेश करणारे ५ गावांचे सरपंच, पाडळसे, पिंपरूड, पिंप्री, न्हावी, रजोदे, सांगवी खू, यासह जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन झाल्टे यांनी केले. यावेळी कार्यक्रमात पारसाडे माजी सरपंच बबिता तडवी, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी, भरत लिधुरे, आदिवाशी कोळी महासंग युवा जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी, मनोज करणकाळ, खन्ना माळी, अनंत जोशी, सागर चौधरी, चंदन सोनवणे इत्यादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.