रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनांक 18 /1/ 2024 रोजी रावेर तालुक्यातील विटवे गावातील दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वउत्पन्न निधीतून पाच टक्के 5% निधी वाटप करण्यात आला. राज्य शासनाच्या 2016 च्या शासन जी आर नुसार संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व ग्रामपंचायत यांना दिव्यांग बांधवांच्या हक्काचा पाच टक्के5% निधी वाटप करण्याचा आदेश दिलेला आहे. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील विटवे येथील ग्रामपंचायत मध्ये सन 2016 च्या जीआर नुसार पहिल्यांदा रावेर तालुका शिवसेना उपाध्यक्ष ,(लोकनियुक्त सरपंच) मुकेश चौधरी यांच्या हस्ते सांगवे व विटवे येथील दिव्यांग बांधवांना प्रत्येकी दोन हजाराचा चेक देऊन त्यांच्या हक्काचा दिव्यांग निधी वाटप करण्यात आली. त्या ठिकाणी उपस्थित लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी ग्रामसेवक एम आर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य निधी वाटप ठिकाणी उपस्थित होते.