रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) - संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने दि. ९ जानेवारी मंगळवार रोजी रावेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन रावेर तेली समाजा तर्फे करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता रावेर शहरातील प्रमुख मार्गावरुन संत श्री संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असलेल्या पालखीची भजन मंडळीसह सवाद्य मिरवणूक, नंतर तिर्थप्रसाद व दुपारी १ वाजता भंडारा कार्यक्रमाचे आयोजन, तेली समाज नियोजित मंगल कार्यालय जागा, राजे छत्रपति शिवाजी महाराज चौक, श्रीकृष्ण गौशाळे जवळ करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे हि विनंती तेली समाज पंच मंडळ, रावेर तर्फे करण्यात आली आहे.