रावेर (प्रशांत गाढे) : रेंभोटा ता.रावेर येथे त्यागमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 फेब्रुवारी पासून 10 दिवशीय महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. [ads id="ads1"]
शिबिराला सुमारे 40 महीलाची उपस्थिती होती व कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर विहारात मान्यवरांच्या हस्ते प्रतीमचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. [ads id="ads2"]
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष आद.राजेंद्र अटकाळे साहेब,भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, महिला कोषाध्यक्ष कल्पनाताई तायडे,जिल्हा संघटक भारतीताई तायडे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अवरमल तालुका सरचिटणीस संघरत्न दामोदर,प्रकाश सरदार,गोविंदा तायडे रमेश वाघ,उपाध्यक्ष गौतम अटकाळे, संतोष तायडे, सचिव महेंद्र तायडे, रितेश निकम व गावातील बौध्द उपासक व उपासीका यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली.