विवरे ता.रावेर (संजय मानकरे) : जि प मराठी शाळा विवरे खुर्द ता रावेर येथे इ 1 ली ते 7 वी च्या विदयार्थ्यांचा सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सौ स्वरा पाटील यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून श्री शैलेश दखने साहेब गट शिक्षण अधिकारी रावेर,श्री संदिप पाटील ग्राम पंचायत सदस्य,श्री रामदास ( गोटु ) चौधरी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती ,श्री हर्षवर्धन तायडे सर शिक्षण तज्ञ शालेय व्यवस्थापन समिती , श्री अतुल पाटील ग्राम विकास अधिकारी,सौ दिव्या गाढे, सौ रूक्सार बी पिंजारी, श्री नामदेव राठोड ,श्री किरण सोनवने, शेख साबीर व अनिल मानकरे पत्रकार विवरे हे होते.[ads id="ads1"]
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकदंता एकदंता, नाववरी साडी पाहिजे, पापा मेरे पापा, पाटलांचा बैलगाडा,झुमका वाली पोर ,गुलाबी शरारा, रिद्धी सिद्धी के दाता,ललाटी भंडार,माय भवानी,दैवत छत्रपती,भिमाची पुण्याई, धनगराची बानू, एकली एकली, फुगे घ्या फुगे ,राम आयेंगे, आपलीच हवा,छोटा बच्चा समझके, चंदा चमके चम चम,गुलामी का तूट गया जाल,गोंडावाली पोर,मिठे मिठे सावरे की ,फिरी फिरी नाच,चढ गया भगवा रंग,भुरूम भुरूम,जाऊ चोपडा,आमच्या पप्पांनी गणपती आणला,व देश भक्तीपर गीत,इ गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वेशभूषा, केशभूषा तसेच हावभावसह आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. [ads id="ads2="]
अध्यक्षीय भाषणात सौ स्वरा पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, शिस्त व खूप सुप्त गुण असतात व अशा कार्यक्रमातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो याविषयी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पुष्पगुच्छ यांचे कौतुक केले. श्री शैलेश दखने साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच श्री विलास कोळी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी रावेर यांनी भ्रमनध्वनी वरून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या...
याप्रसंगी सर्व ग्रामस्थ,पालक वर्ग, माजी विद्यार्थी, महिला भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सौ प्रभावती नेहेते,उपशिक्षक श्री मंगला डोळे,श्री दिपक सोनार,श्री कुमुदिनी महाजन श्रीम मनिषा चौधरी तसेच उषाबाई पाटील व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले....