चिंचाटी येथील रसूल तडवी यांच्या हत्येतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर / फिरोज तडवी

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील  सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी यांची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा अशा प्रकारचे निवेदन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने सावता पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

 सविस्तर वृत्त असे की चींचा टी गावाजवळ असलेल्या लोहारा गावाच्या यात्रेत कव्वालीचा कार्यक्रम बघण्यासाठी केला असता अचानकच त्या रात्री  लोहारा गावाजवळूनच असलेल्या गौरखेडा गावाजवळच्या सुकी नदीच्या पात्रात रसूल रशीद तडवी याचा मृत्यू देह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला रसूल तडवी हा घरातील कर्ता पुरुष  असुन गावात सर्वांशी मन मिळून असल्याने त्याचा घात पात झाल्याचा संशय नातेवाईकांनी केला असून ही घटना 28 जानेवारी रोजी रात्री घडली असून अद्याप  पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा तपास निष्पन्न न झाल्याने सदर प्रकरण सीआयडी चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

सदर प्रति गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर, सहायक पोलीस निरीक्षक सावदा सदर प्रति पाठवण्यात आले असून सदर संघटनेचे अध्यक्ष सलीम छबु तडवी यांच्या सही सह अनेक समाज सेवकांच्या सहिनिशी निवेदन सावदा पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!