राजोरे जि.प.मराठी शाळेचा 110 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील)

यावल तालुक्यातील राजोरा येथील जि.प.मराठी शाळेत बाल आनंद मेळावा व ऐतिहासिक असलेल्या या शाळेचा 110 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"] 

   तसेच या कार्यमानिमित्त मराठी शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजोरे ग्रामपंचायत सरपंच सौ.पुष्पाताई पाटील तसेच ग्रा.प.सदस्य सुवर्णा महाजन,रोहिणी बोरोले,पोलीस पाटील मुक्ता गोसावी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील सर या सर्व प्रमुख मान्यवरांच्या  उपस्थित दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पालक मंडळी व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads2"] 

   राज बारेला या विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापून शाळेचा 110 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कला निर्माण व्हावी व व्यवहार ज्ञान वाढवे यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री कौशल्य व व्यवहार कौशल्य या गोष्टी प्रत्यक्ष आनंद घेतला सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी वर्षभर होणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली उपशिक्षिका संध्या सोनवणे व सागवी खुर्द येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका काळवीट मॅडम व वैशाली पाटील मॅडम सहकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!