यावल शहरात महास्वच्छता अभियानाचा " फियास्को "

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जिल्हाधिकारी साहेब यावल शहराची पाहणी करा...

दिव्याखाली अंधार कसे असते ते दिसेल..

यावल  ( सुरेश पाटील ) जिल्हाधिकारी साहेब जळगावहून भुसावळ मार्गे किंवा किनगाव मार्गे आले तरी दोघी बाजूने यावल शहरात प्रवेश करताना बोरावल दरवाजापासून अर्धा किलोमीटर अंतरावर यावल भुसावळ रस्त्याच्या वळणावरआणि महाराणा प्रतापनगर मधून नगरपालिकेत नदीपात्रातील रस्त्यावरून येताना नगरपालिका कार्यालयापासून १०० ते २०० मीटर अंतरावर हरिता-सरिता नदी पात्रात महास्वच्छता अभियानाचा "फियास्को" यावल नगरपालिकेने कसा केला आणि नगरपालिकेच्या दिव्याखाली अंधार कसे आहे हे प्रत्यक्ष दिसून आल्याशिवाय राहणार नाही.[ads id="ads1"] 

    महाराष्ट्र शासन नगर विकास विभागतर्फे १२ जानेवारी २०२४ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे आणि यावर शासनाने जनजागृतीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च जाहिरातीच्या माध्यमातून केला आहे.सर्वेक्षण २०२३ अभियानात राज्यातील अनेक शहरांना पुरस्कार प्राप्त सुद्धा झाले. स्वच्छ शहर विकासाकडे अग्रेसर ध्येय आणि उद्दिष्ट असताना मात्र यावल शहरात महास्वच्छता अभियानाचा "फियास्को" झाल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.[ads id="ads2"] 

       गेल्या २/३ दिवसांपूर्वी यावल नगरपालिकेकडून महास्वच्छता अभियान आठवडे बाजारात राबविण्यात आले.हे अभियान यावल नगरपालिकेच्या विश्वासातील खास कर्मचाऱ्यांनी राबवून संबंधित यंत्रणेची दिशाभूल करून प्रसिद्धी सुद्धा मिळवून घेतली प्रसिद्धी करताना मात्र शहरात खरोखरच सर्व प्रभागातील सर्व ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविले गेले का..? याची चौकशी किंवा खात्री न करता प्रसिद्धी करण्यात आली,यांना यावल नगरपालिकेजवळ महाराणा प्रताप नगर कडे जातानाच्या रस्त्यात नदीपात्रात प्रचंड असलेली घाण नदीपात्राचे झालेले प्रदूषण दिसून आले नाही का..? याचप्रमाणे बोरावल दरवाज्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर यावल भुसावळ वळणावर कशी दयनीय अवस्था झाली आहे यावल नगरपालिकेला व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसून येत नाही का..? याचप्रमाणे महास्वच्छता अभियानात यावल शहरातील अनेक मोकळ्या जागांवरील घाण केर कचरा आजही जैसे थे आहे.यावल बस स्टॅन्ड जवळील ऐतिहासिक पाय विहीर कचऱ्याने फुल भरण्याच्या मार्गावर आहे. यावल पंचायत समितीच्या मागील बाजूस मोकळ्या पटांगणावर कशी दयनीय अवस्था झाली आहे इत्यादी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी जळगाव यांनी केल्यास यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात महास्वच्छता अभियानाचा फियास्को कसा झाला म्हणजे यावल नगरपालिकेच्या दिव्याखाली कसे अंधार आहे हे प्रत्यक्ष दिसून आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!