रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक 21फेब्रुवारी 2024 पासुन कुसुंबा खुर्द येथे पाल रस्ता जे सी बी ने खोदून त्या खड्ड्यामध्ये बसुन रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती बेमुदत धरणे आंदोलन करून हा रस्ता वाहतकीसाठी बंद करणार आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की सन 2016मध्ये भारतीय राजमार्ग सडक परिवहन मंत्रालय दिल्ली यांनी भारतीय राजपत्रा मध्ये रावेर पाल रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता प्रजीमा क्र.1म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडेच असुन या रस्त्याने दरोरोज शेकडो मालवाहू ट्रक व अवजड कंटेनरची चोरटी वाहतूक होत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे पाल, निमड्या, सहस्त्र लिंग, कुसुंबा खुर्द,कुसुंबा बू, लोहारे, मुंजलवाडी, सिंदखेड येथील सर्व राजकीय पदाधिकारी, सर्व सरपंच उपसरपंच व ग्रा. प. सदयस यांनी एकत्र येत रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती चे माध्यमातून दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी सो जळगांव यांना निवेदन देऊन जोपर्यंत रावेर पाल रस्ता हायवे मध्ये रुपांतरीत होत नाही तोपर्यंत या रस्त्याने होणारी अवजड वाहांनाची चोरटी वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती. [ads id="ads2"]
मात्र प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने सदर कृती समितीच्या वतीने मान. तहसीलदार सो रावेर, मान. पोलीस निरीक्षक सो रावेर, मान. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर यांची भेट घेऊन सदर रस्त्यावर रावेर येथे आय टी आय कॉलेज जवळ व पाल येथे मध्यप्रदेश सीमेवर कायमचे बॅरीकेट्स लाऊन हा रस्ता अवजड वाहतुकीस दिनांक 20/2/2024 बंद करण्यात यावा अन्यथा दिनांक 21/2/2024 रोजी सकाळी 11वाजेपासून कुसुंबा खुर्द येथे पाल रस्ता जे सी बी ने खोदून त्या खड्ड्या मध्ये बसुन रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे अशी निवेनाद्वारे मागणी केलीली आहे. यावेळी रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती अध्यक्ष व बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील , प्रदीप सपकाळे कुसुंबा खुर्द, कमिल नामदार तडवी पाल, संजय पवार पाल, मुबारक तडवी सर कुसुंबा खुर्द, अशोक हिवराळे मुंजळवाडी, मुकेश पाटील कुसुंबा खुर्द, चांगो भालेराव कुसुंबा, लियाकत तडवी लोहारे, सलीम छबु तडवी कुसुंबा, नुरा भाई तडवी, इरफान तडवी निमड्या, रतन पावरा निमड्या व रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.