रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक आज दिनांक १६. शुक्रवार रोजी दुपारी १२. वाजता वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शमीभा ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये रावेर लोकसभा मतदारसंघातील बुथ कमिटी व सर्कल बांधणे तसेच पक्ष बांधणी करून याद्या लवकरात लवकर पक्ष तालुकाध्यक्षांकडे सादर करायचे आहे. [ads id="ads1"] लवकरच रावेर तालुक्यातील ७.ही गटात मध्ये मीटिंगांचे आयोजन करण्यात येईल अशा विविध विषयांसंदर्भात जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले.
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी रावेर तालुक्याचा संपूर्ण आढावा सांगितला.[ads id="ads2"]
या बैठकीला जिल्हा महासचिव एड. योगेश तायडे, जिल्हा संघटक ईश्वर लहासे ,सुरेश अटकाळे, शेख याकूब शेख निसार, ज्ञानेश्वर तायडे, राजेंद्र अवसरमल, सलीम शहा, संजय कोचुरे, कैलास तायडे, कंदर सिंग बारेला, प्रकाश तायडे, रघुनाथ कोंगे, शेख इम्रान, विजय भालेराव, शंकर लहासे, शिवा बेलदार, विनोद कोळी, करण तायडे, दौलत अडांगळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ सुजाता कोचुरे सौ ललिता कोचुरे, सौ कविता कोचुरे,सौ नेहा कोचुरे सौ अलका तायडे,सौ उषा चौधरी, मासूम तडवी ,सायरा इस्माईल तडवी.बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले आभार प्रतीक दामोदर यांनी मानले.