सावदा येथे संतप्त नागरिकांनी कचरा टाकला चक्क नगरपालिके समोर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)

सावदा :- सावदा येथे गेल्या काही दिवसा पासून नगर पालिकेने नागरिकांनी तक्रारी केल्यावर शहरातील गटारी साफसफाई करण्याचे कामहाती घेतले व गटारीतील गाळ काढण्याचा ठेका दिला व गाळ काढण्यात आला तथापी सदर काढलेला गाळ हा नागरिकांकने घरासमोर टाकण्यात आला त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता याबाबत नागरिकांनी अनेक वेळा सावदा पालिकेत आरोग्य विभागात याबाबत तक्रारी केल्या पण याकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले गेले.[ads id="ads1"] 

         सर गाळ गेल्या आठ ते दहा दिवसापासून नागरिकांचे घरा सोमर पडून असल्याने त्रासास सोमारी जावे लागत होते प्रचंड अस्वच्छता डास होत असल्याने अखेर आज दि 16 रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान मोठा आखाडा, रविवार पेठ भागातील संतप्त नागरिकांनी सदर गाळ भरून आणला व नगरपालिके समोर टाकून आपला संताप व्यक्त केला यावेळी नागरिकांनी आरोग्यविभागात जाऊन आरोग्य निरीक्षक सचिन चोळके यांना जाब विचारला तर शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या माणसांने सदर कचरा उचलण्याची जबादारी आपली नसल्याचे सांगत हात यापुर्वीच झटकले होते,आपला फक्त कचरा उचण्याचा संबंध असून सदर गाळ ज्या ठेकेदार याने काढला त्यालाच गाळ उचलावा अशी भूमिका मांडली होती त्यामुळे गाळ न उचला गेल्याने आजची परिस्थिती ओढवली परंतु यात त्रास मात्र नागरिकांना होत आहे,[ads id="ads2"] 

   तर संबंधित ठेकेदार यांचे वर मात्र आरोग्य प्रशासन यांचा वचक नसल्याचे यातून स्पष्ट झाले, व मुजोर ठेकेदार यास आरोग्य विभाग वेळोवेळी पाठीशी घण्याचे काम करीत आहे असा संताप देखील व्यक्त केला,यावेळी शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष सूरज परदेशी,भाजपा अयोग्य आघाडी तालुकाअध्यक्ष रितेश पाटील ,गुलाम शेख अश्रफ मंजूर, गुलाम शेख फरीद मंजूर,यांचे सह नागरिक उपस्थित होते यावेळी उवस्थित नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला,दरम्यान सावदा पाकिकेत मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने सुमारे दहा ते बारा दिवसा पासून येथे मुख्याधिकारी नाही नगर पालिका वाऱ्यावर आहे नागरिकांना च्या समस्या सोडविण्यास कोणीही अधिकारी नाही प्रशासक येऊन फिरकत नाही अशी येथील अस्वस्थता झालेली आहे यामुळे शहरात कचऱ्या सह अनेक समस्या असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकाची तक्रार आहे दरम्यान आज चक्क पालिके समोर कचरा आणून टाकल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडालेला दिसला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!