सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा शहरात मस्कावद रोड येथील हाजी इक्बाल शेख हुसैन(डायमंड हॉल)येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर खानदेश विभागीय अध्यक्ष नितीन गाढे यांची अध्यक्षता मध्ये घेण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्षा नंदाताई लोखंडे यांनी केले.यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.[ads id="ads1"]
या शिबिरात भारत मुक्ती मोर्चाचे खांदेश विभागीय अध्यक्ष नितिनजी गाढे यांनी संघर्षात्मक भूमिका मांडली व उपस्थित मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
त्यानंतर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डाॅ.शाकिर शेख सर जळगाव यांनी प्रबोधनात्मक पद्धतीने प्रशिक्षक म्हणुन देशात सुरू असलेल्या लढाई संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन करताना पुढील वाटचाल कशी करावी लागेल याबाबत माहिती दिली.याप्रसंगी लक्ष्मीताई मोरे मॅडम,प्रतिभाताई मेढे मॅडम, आबिद सर(बामसेफ तालुकाध्यक्ष यावल,प्रद्युम्न वार्डे जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा,शेख निसार अहमद,शहीद अब्दुल हमीद संस्थाचे अध्यक्ष शेख मुख्तार,उपाध्यक्ष फिरोज खान,अमजद खान,अंनिस इब्राहिम,शेख चाँद,इरफान मियां, मोहसीन शाह,शकील भाई,साबीर कुरैशी,आबीद सर फैजपूर,शेख मोईन सह संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश तायडे सर जिल्हा उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिस भाई यांनी केले.




.jpg)