अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत प्रधानमंत्री यांच्याहस्ते देशभरातील 554 रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन ; अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत रावेर रेल्वे स्टेशनची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

भारतीय रेल्वे विभागाच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत  देशभरातील  554 रेल्वे स्टेशन व 1500 रेल्वे उड्डाणपूल/अंडरपास   विकास कामांचे *प्रधानमंत्री  नरेंद्रजी मोदी  यांच्याहस्ते एकाचवेळी दूरदृष्यप्रणाली द्वारे भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी रावेर लोकसभा* क्षेत्रातील  रावेर रेल्वे स्टेशन  येथे आयोजित कार्यक्रमात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे  यांची प्रमुख उपस्थिती होती. [ads id="ads1"]  

  तर  प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस  उप अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग, जीप माजी उपाध्यक्ष सौ रंजना पाटील, भाजपा प्रदेश सदस्य  सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष महेश  चौधरी, रेल्वे समिती अध्यक्ष अरुण शिंदे, उद्योजक  श्रीराम पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीश गणवानी, केला युनियन चे अध्यक्ष रामदास पाटील, भागवत पाटील,  स्वातंत्र्य सैनिक वारस दिलीप वैद्य, प्रशांत पासे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक सुरेश गुप्ता यांनी केले.  दीप प्रज्वलन नंतर श्रीराम मेक्रो विजन अकादमी स्कुल,  कमलाबाई गर्ल्स स्कुल, पोदार, राका स्कुल, जीप स्कुल अजंदा येथील विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर अमृत भारत स्टेशन अंतर्गत उपस्थित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेते स्पर्धक यांना बक्षिसे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उप अधीक्षक श्रीमती सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. तर रक्षा ताई खडसे यांनी मा. नरेंद्र जी मोदी यांच्या द्वारा विकसित विविध उपक्रम सांगितले .[ads id="ads2"]  

  यात.अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत  रावेर रेल्वे स्टेशनची निवड झालेली असून, योजनेमध्ये स्थानकांच्या सतत विकासासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आहे. यामध्ये विविध स्टेशन सुविधा वाढविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. या सुधारणांमध्ये स्थानक सुलभता, प्रतीक्षा क्षेत्र, शौचालय सुविधा, आवश्यकतेनुसार लिफ्ट आणि एस्केलेटरची स्थापना, स्वच्छता, मोफत वाय-फाय ऑफर करणे, 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' सारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी किओस्क उभारणे, प्रवासी माहिती प्रणाली वाढवणे, स्थापना करणे यांचा समावेश आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंज, बिझनेस मीटिंगसाठी जागा निश्चित करणे, लँडस्केपिंगचा समावेश करणे आणि प्रत्येक स्टेशनच्या अन्य आवश्यकता पूर्ण करणे. अशी विविध विकास कामे स्टेशनवर करण्यात येऊन, प्रवाश्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिपक नगरे व गजाला तबस्सूम  यांनी केले. तर आभार वेलफेअर अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य निरीक्षक निलेश बाथो, मुख्य आरक्षण अधीक्षक शेख नावेद, स्टेशन अधीक्षक बी पी बालमिक, खंडवा मुख्य रोखपाल बी जी वर्मा 

तपासणीस रमण शर्मा, वाणिज्य निरीक्षक श्री केशव, वरिष्ठ तिकीट लिपिक अंकिता पाटील यांच्यासह सर्व रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

तर सेवा निवृत्त उप अधीक्षक काशिनाथ भारते, विक्री कर अधिकारी आर व्ही पाटील, भाजपा पोलीस अधिकारी श्री चौधरी,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सपोनि प्रवीण निखाळजे, पोउनी श्री तांबे,  adv.योगेश गजरे, 

भाजपा पदाधिकारी राजन परीला, पी के महाजन, वासुदेव नरवाडे, शैलेश अग्रवाल, युवा अध्यक्ष दिलीप पाटील आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!