भुसावळ:-तालुक्यातील निभोरा ब्रु || येथे दि.25/02/24 रविवारी साय.7:00 वाजता त्रिरत्न बुद्ध विहारात नुकतीच बैठक बौद्ध जन परिषद चे अध्यक्ष एन. टी. इंगळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली त्या बैठकीला प्रमुख माजी सरपंच प्रभाकर साळवे, मधुकर हातोले, संतोष बाऱ्हे, रमेश खंडारे, अरुण भालेराव, अनिल तायडे याची उपस्थिती होती तर सूत्रसंचालन प्रकाश सरदार यांनी केले.
बैठकीत मागील वर्षाचा हिशोब वाचून दाखविण्यात आला तो सर्वानुमते पास झाला. बैठकीत पुढीलप्रमाणे या वर्षीची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली अध्यक्ष निलेश सुरवाडे,उपाध्यक्ष गोटू खंडारे , सचिव आकाश पवार, सहसचिव बिट्या बाऱ्हे,कोषाध्यक्ष विशाल जोहरे,सहकोषाध्क्ष प्रणव मेश्राम,संघटक अजय वाघ, सह संघटक नितीन वाकोडे, सागर नाईक,प्रसिद्धी प्रमुख विद्यानंद मेश्राम,संरक्षण समिती प्रमुख राहुल सरकटे,बंटी साळवे, विशाल मेश्राम, मोनू चोपडे, चेतन तांबे, निखिल नरवाडे, गौरव नरवाडे, सुभाष प्रधान, संजय मेश्राम, शेखर मेश्राम, अविनाश जाधव, साहिल साळवे,सुमित चतुर, सोनू गायकवाड सल्लागार व मार्गदर्शक ए. टी. इंगळे, प्रभाकर साळवे, मधुकर हातोले, प्रकाश सरदार, रमेश खंडारे, अरुण भालेराव, अनिल तायडे, संतोष बाऱ्हे, रमेश बोदडे, मीराबाई नरवाडे याप्रमाणे नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.नवीन कार्यकारणीचे अभिनंदन व आभार प्रकाश सरदार यांनी केले.