बिनशेती परवानगी मिळालेल्या व न मिळालेल्या गट नंबर मधून माती वाहतुकीचा गोरख धंदा ? जागेचे मोजमाप करून दंडात्मक कारवाईची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल ( सुरेश पाटील ) यावल भुसावल रोडवर यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात व यावल तहसील कार्यक्षेत्रातील बिन शेती परवानगी मिळालेल्या व बिन शेतीची परवानगी न मिळालेल्या गट नंबर मधून तहसील व तलाठी कार्यालयाला सुट्टी असते त्या दिवशी विकासक आणि शेतमालक उंच टेकड्यांचे जेसीपी मशनरीच्या साह्याने उत्खनन व सपाटीकरण करून त्या मातीची सर्रासपणे वाहतूक करून आर्थिक कमाई करून शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडवीत असल्याने यावल तहसीलदार यांनी आपल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत सदरील जागांचे मोजमाप करून विकासक आणि शेत मालका विरुद्ध दंडात्मक, फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.[ads id="ads1"] 

        यावल भुसावल रोडवर बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर व दुसऱ्या एका गट नंबर मध्ये बिनशेतीची परवानगी मिळण्याचा आधीच उंच भागाचे जेसीपी मशीनरीच्या सहाय्याने उत्खनन करून व जेसीपी मशीनच्या सहाय्यानेच ट्रॅक्टर,डंपर मध्ये माती भरून इतरत्र ठिकाणी बेकायदा सर्रासपणे वाहतूक करण्यात आली व पुढे सुद्धा वाहतूक होणार आहे यात शेतमालकांनी व विकासकांनी यावल महसूलची शुद्ध दिशाभूल फसवणूक करून सुट्टीच्या दिवशी सर्रासपणे मातीची वाहतूक करून लाखो रुपयांची कमाई करून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली असल्याने यावल तहसीलदार यांनी आपल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत सदरील जागांचे मोजमाप करून विकासक आणि शेतमालक यांच्याविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.[ads id="ads2"] 

        यावल नगरपालिका हद्दीत अनेकांना जमिनीस रहिवास प्रयोजनार्थ बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार यावल व नगरपरिषद यावल यांनी घालून दिलेल्या सर्व अटी शर्तीची पायमल्ली करीत विकासाकांनी आपल्या सोयीनुसार आपले उद्दिष्ट सुरू ठेवले आहे यात मात्र प्लॉट घेणाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत असून त्यांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच काही विकासकांनी तर मूळ शेत मालकाच्या नावावरच प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवसाय सुरू ठेवून विविध टॅक्स बुडवीत असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी व कारवाई करावी अशी सुद्धा मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!