यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ संचालकपदाची निवडणूक नुकतीच संपली,चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी कोणाची निवड करायची..? या संदर्भात नवनिर्वाचित संचालकांची तातडीची बैठक भालोद येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे यांच्यासह सहकार पॅनल प्रमुखांच्या उपस्थितीत आज आता दि.२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत संपन्न होत आहे. [ads id="ads1"]
या बैठकीत तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागाला योग्य तो न्याय देऊन पक्षाच्या एकनिष्ठ असलेल्या संचालकाला चेअरमन तसेच व्हाईस चेअरमनपदी नियुक्त करण्यासाठी आणि त्यानंतर नामनिर्देशन पत्र आजच ११ वाजता दाखल करण्यासाठी निश्चित असा ठोस निर्णय घेऊन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होणार आहे आणि पुढील पाच वर्षात कोणाकोणाला संधी द्यायची याबाबत सुद्धा निर्णय घेतले जातील,यामुळे अनुक्रमे तालुक्यातील पश्चिम - पूर्व भागात राजकारणात समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads2"]
झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी मतदानासाठी मनसोक्तपणे ' फुली ' वर आणि इतर लाखो रुपयाचा खर्च केला असला तरी संबंधितांनी फक्त व्हाट्सअप,फेसबुक माध्यमातून आपल्या लेव्हलवर प्रसिद्धी केली होती आणि आहे,परंतु प्रिंट मीडिया ऑनलाइन अशा माध्यमांना मात्र कंजूसी दाखवीत, आश्वासने देत फारसे महत्त्व न देता लोकप्रतिनिधींनी आपले काम फत्ते करून घेतल्याने तालुक्यातील प्रसिद्धी माध्यमात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.