यावल ( सुरेश पाटील ) यावल शहरात विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्च नवीन पाईपलाईन टाकण्यात आली,परंतु ठेकेदार आणि यावल नगरपरिषद बांधकाम विभागाच्या संगनमताने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे टाकलेल्या पाईपलाईनचे ठिकठिकाणी बारा वाजले, नेहमी पाईपलाईन लिक होत असते पर्यायी दुरुस्तीसाठी खड्डे खोदल्यानंतर रस्त्याचे बारा वाजत आहेत.[ads id="ads1"]
विकसित भागात पांडुरंग सराफ नगरमध्ये शंभर ते दोनशे मीटर अंतरात राजू तडवी, सरोदे सर, साई बॅटरी सर्विसेस यांच्या घराजवळ दोन ठिकाणी आणि त्या आधी फैजपूर रोडवर नगरपरिषदेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे रस्त्याचे १२ वाजले आहेत यात एका ठिकाणी खड्डा खोदल्याने त्या ठिकाणी वृक्षारोपण केल्याचे सुद्धा दिसून येत आहे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना समाजसेवकांना मात्र तोंड बंद करून मुकामार सहन करावा लागत असल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाईपलाईन दुरुस्ती झाल्यानंतर किंवा गटारीचे बांधकाम झाल्यानंतर त्या ठिकाणचे आजूबाजूचे बांधकाम साहित्य माटी ठेकेदार जागेवरच ठेवत असल्याने आणि ठेकेदाराने व्यवस्थित काम केले आहे किंवा नाही हे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित बांधकाम अभियंता, बांधकाम विभाग प्रमुख प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ठेकेदार सांगेल त्या इस्टिमेट प्रमाणे बिल देयक काढून समन्वय साधत असल्याने रस्त्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.काही लोकप्रतिनिधी,काही विविध संघटनाचे यावल शहरातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने यावल नगरपरिषदेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी आता नागरिकांना काय करावे लागेल..? असा प्रश्न आता संपूर्ण यावल शहरात उपस्थित केला जात आहे.[ads id="ads2"]
यावल शहरात गंगानगर, तिरुपतीनगर रस्त्यावरील
स्वामी समर्थ मंदिरा जवळ फक्त १०० मीटर अंतराचा
सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम केल्यानंतर ठेकेदाराने
त्याच ठिकाणी बांधकाम साहित्य व मिक्सर जागेवरच
ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.नगरपालिका बांधकाम विभाग झोपले आहे का..?
असा प्रश्न उपस्थित होत आहे.