चिंताजनक:-भारतीय स्टेट बँकेच्या सावदा शाखेत घडला मूळ खातेदार बदलून देण्याचा प्रकार!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



"भारतीय स्टेट बँकेचा अर्थ म्हणजे लोकांचा विश्वास असे गृहीत धरले जाते.परंतु या प्रकार मुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असून,खरे खोटे काय याची खात्री करणेकामी वार्ताहर या नात्याने बँकेत गेले असता सदरील प्रकार घडला असून,हा खाता बंद केला आहे.व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची  माहिती मी दिली आहे.तसेच याबाबत आमचे वकिलांच्या सल्ल्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.असे बँक मॅनेजर उमेश साखरे यांनी यावेळी माध्यमांची बोलताना सांगितले.[ads id="ads1"]  

सावदा ता.रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- येथील भारतीय स्टेट बँकेच्या सावदा शाखेत शहरातील शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचा बँक खाता सहा.धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्या कडून प्रमाणीत शेडूल १ वरील सचिव शेख सुपडू शेख रशीद व खजिनदार यांचे पद नावाने अधिकृत दस्तावेज सादर करून अनेक वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता व आहे.[ads id="ads2"]  

पंरतू या खातेवर नुकतेच ५० हजार रुपये विडरोल केल्या संदर्भातचा संदेश अधिकृत खातेदार सचिव शेख सुपडू यांचे मोबाईलवर आल्याने त्याच दिवशी या बँकेत जावून येथील मॅनेजर उमेश साखरे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार मुळ खातेदाराने सांगितल्यास त्याचवेळी चौकशी अंती बँकेत समजले.की,मुळ खातेदारांच्या ऐैवजी या संस्थेचे खातेवर सहा.धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्या कडून प्रमाणीत नसलेले स्वयंघोषित सचिव व खजिनदार यांची नावे तात्कालीन मॅनेजर यांच्या कालखंडात बदलून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तरी सदरील खाता बंद करण्यात यावे.व खोटे दस्तऐवजांच्या आधारे मुळ/अधिकृत खातेदारांच्या जागी ज्या स्वयंघोषित संचालकांचे पद नाम लावण्यात आले.यांची व यांनी बँकेत सादर केलेले दस्तावेजांची  तात्काळ सखोल चौकशी करून आत्ताचे कार्यरत बँक मॅनेजर यांनी दोषींच्या विरुद्ध आपल्या स्तरावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अशी प्रमुख मागणी संस्थेचे मान्यता प्राप्त सचिव शेख सुपडू शेख रशीद मंन्सुरी यांनी रजिस्टर पोस्टद्वारे पाठवलेल्या लेखी पत्रद्वारे बँकेचे मॅनेजर उमेश साखरे यांच्याकडे केलेली आहे.तरी अशा लोकांविरुद्ध बँक तर्फे कधी व कोणती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!