हमी पत्र भरून घेतले का..?
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई कधी...!
.यावल तालुक्यात ८४ गावात रेशन धान्य वाटप एकूण दुकाने १२४ आहेत त्यात अंदाजे प्राधान्य,अंत्योदय धान्य वाटप योजनेअंतर्गत अंदाजे ५० ते ५५ हजार लाभार्थी आहेत यांना स्वस्त धान्य वाटप करताना मोठा घोळ असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्यात स्वस्त धान्य माल दुकानात पोहोचतो तेव्हा आणि त्यानंतर स्वस्त धान्य माल प्रत्यक्ष दुकानात गेला आहे किंवा नाही स्टॉक रजिस्टर,सेल रजिस्टर,कॅश मेमो वेळेवर भरले जात आहेत किंवा नाही दुकानात फलक लावलेले आहेत का..? रेशन दुकान प्रत्यक्ष कोण चालवीत असतो..? महिना अखेर दुकानात स्वस्त धान्य शिल्लक किती..? त्याचे रिपोर्ट वेळेवर दिले जातात का? सध्या आनंदाचा शिधा सुरू असलेले वाटप किट घेणारे नेमके लाभार्थी कोण कोण आहेत कोणी लाभ घेतला याची संबंधित दुकानात दर्शनी भागावर माहिती द्यायला पाहिजे, दुकान तपासणी प्रत्यक्ष केली जाते का..? तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई काय..?
शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित दुकानात आम्ही पत्राचा नमुना वरून कुटुंब प्रमुखाचे नाव तारीख इत्यादी नमूद करून आम्ही पत्र भरून दिले आहे किंवा नाही याची खात्री केली का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जिल्हा पुरवठा अधिकारी व यावल तहसीलदार साहेब यांनी यावल पुरवठा कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानातील लाभार्थ्यांची चौकशी खात्री करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.


