माहिती दिल्याच्या संशयावरून मजूरांना उपाशी मारण्याची धमकी..?
यावर नगरपालिका ठेकेदारीत मजुरांच्या टाळूवरील लोणी खाणारी यंत्रणा कार्यरत. मुख्याधिकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्तांना द्यावी लागते टक्केवारी..? असे वृत्त दैनिक साईमत मध्ये दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्याने आणि ठेकेदारांमार्फत कामावर असलेल्या मजुरांनी प्रसिद्धी माध्यमास माहिती दिल्याचा संशय घेत यावल नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी आणि ठेकेदाराने संबंधित काही मजुराना कामावरून बंद करून टाकण्याची धमकी देत तुम्हाला उपाशी मारू यापुढे प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊ नका आणि माहिती कोणी दिली याचा तपास करून सांगा असे दबाव तंत्र वापरले जात आहे यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी जळगाव यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.[ads id="ads1"]
यावल नगरपालिकेत विविध ठिकाणी विविध कामे मजुरांमार्फत करण्यासाठी यावल नगरपरिषदेने रीतसर टेंडर काढून मजूर पुरविण्यासाठी टीका दिला होता आणि आहे परंतु या ठेकेदारीत मजुरांना शासन नियमानुसार त्याच्या कामाचा मोबदला म्हणून ठेकेदार काही मजुरांना कमी मजुरी / वेतन कमी देऊन तसेच काही मजुरांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे ३ शिफ्टचे काम सतत एकाच २४ तासाच्या शिफ्ट मध्ये मजुराकडून करून घेत असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना कोणी दिली..? असा काही मजुरावर संशय घेऊन त्यांना कामावरून काढून टाकण्याचे धमकावले जात असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. [ads id="ads2"]
या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद विभाग सहाय्यक आयुक्त, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी,संबंधित विभाग प्रमुख आणि ठेकेदाराचे संगमनमत असल्याने कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी स्वतः किंवा एक समिती नियुक्त करून संबंधित सर्व मजुरांची जात जबाब घेऊन त्यांना आतापर्यंत बँकेमार्फत वेतन दिले आहे का त्यांचा पीएफ काढलेला आहे किंवा नाही त्यांना किती रोज दिला जातो प्रत्यक्षात वाउचर वर सह्या कशा कोणत्या प्रकारे घेतल्या जातात याची संपूर्ण चौकशी करून कारवाई करावी असे इतर काही ठेकेदारी वर्तुळात बोलले जात आहे.


