गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये ऐनपूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

 ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेले सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत गांधी विचार संस्कार परीक्षे चे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]  

  ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता माननीय प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी परीक्षेचे महत्त्व पटवून दिले तसेच गांधी विचारांची आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना व देशाचे प्रत्येक तरुण-तरुणीला अत्यंत आवश्यकता आहे असे मत मांडले. परीक्षेचे आयोजन या मंडळाचे समन्वयक प्रा डॉ पी आर गवळी यांनी केले प्रा प्रदीप तायडे , प्रा अक्षय महाजन व प्रा ज्ञानेश्वर कोळी यांनी परीक्षेचे काम पाहिले. गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे.[ads id="ads2"]  

   या निकालामध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी निशा विजय अवसरमल हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला व निकिता समाधान कोळी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला त्याबद्दल प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे सुवर्णपदक व स्मृतीचिन्ह देण्यात आले तसेच दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थिनीला विद्यार्थिनीला सिल्वर पदक व स्मृतिचिन्ह देण्यात आले या यशाबद्दल ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील, अध्यक्ष भागवत पाटील, उपाध्यक्ष आर एन महाजन,सेक्रेटरी श्री संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन व कौतुक केले‌ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी बी अंजने व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!