संत रविदास जयंती निमित्त २४ रोजी दीपनगर येथे व्याख्यानाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ :- श्री संत शिरोमणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिति , दीपनगर तर्फे दिनांक २४ फेब्रूवारी २०२४ रोजी नवीन क्लब , दीपनगर येथे सकाळी १०.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .[ads id="ads1"]  

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता मोहन आव्हाड , मुख्य अतिथि आमदार संजय सावकारे तर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ उपस्थित राहणार आहेत.[ads id="ads2"]  

            या कार्यक्रमास राजेंद्र बावस्कर , रविंद्र सोनकुसरे , मनोहरराव तायडे , अशोक भगत , मुकेश मेश्राम , रविंद्र डांगे आदिंसह काही अधिकारी मोठ्या संखेने हजर राहणार आहेत . 

           संत रविदास यांच्या विविध विचारांवर तसेच कार्यावर जयसिंग वाघ हे आपले विचार मांडनार आहेत , या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संखेने हजर रहावे असे आवाहन समिति तर्फे करण्यात आले आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!