विवरे येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विवरे  ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शाळा व श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती विवरे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने गावात उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली. गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री यादवराव विष्णू पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

   या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विवरे बु. ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री विनोद मोरे यांनी आपल्या शैलीत शिवाई कविता सादर केली. ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी पाटील सर  यांनी आपल्या भाषणातून शिव कार्यावर प्रकाश टाकला. ग्रामपंचायत सदस्या सौ भाग्यश्री विकास पाटील यांनी सोशल नेटवर्किंग साईटचा गरजेपुरता वापर करण्याचे तरुणांना आवाहन केले. 

  कार्यक्रमाला विवरे बुद्रुक गावाचे सरपंच श्री युनूस तडवी,  श्री युसुफ खाटीक ,सौ पुनम बोंडे ,सौ नीलिमा सनंसे तसेच ग्रामविकास अधिकारी श्री जे डी जावळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी शिवजयंती उत्सव समितीचे श्री.किशोर सोपान पाटील, श्री चेतन पाटील ,श्री गोपाळ पाटील, श्री दीपक पाटील ,श्री किरण पाटील ,श्री पवन पाटील श्री.समाधान गाढे, श्री.पंकज मोरे यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद मुलींची शाळा विवरे बुद्रुक येथील मुख्याध्यापक श्री अविनाश बागुल सर यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!