सावदा प्रतिनिधी (युसुफ शाह)
सावदा : येथील इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पस फाऊंडेशन संचलित डायमंड स्कूल & जूनियर कॉलेज मध्ये वार्षिक 2 दिवसीय स्नेह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला गुणांचे सादरीकरण केल्याने पालकांसह पाहुणे देखील भारावून गेले होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष डॉ हाजी हारून सेठ होते,या वेळी सावदा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे साहेब फैजपुर पोलिस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सय्यद मैनुद्दीन साहेब,ऐनपुर येथील प्रगतीशील शेतकरी हाजी रफीक सेठ,रावेर येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मेंबर डायमंड ट्रान्सपोर्टचे संचालक हाजी अजमल सेठ,राजेश भाऊ वानखेडे,कुर्बान मेंबर,इरफान मेंबर,डॉ.दानिश फैजपुर,डॉ. अन्सार,मयूर सेठ महाले,आमदार शिरीष दादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय दाद चौधरी, रज्जौ सेठ,तफ्फो सेठ हाजी हारून सेठ फाउंडेशन चे अध्यक्ष नाजिम शेख अक्रम खान सर,कमल सेठ, बबलू सेठ,गुड्डू मेंबर,सैय्यद शकील,मोहम्मद कलीम यावल, परवेझ सेठ यावल,डायमंड स्कूल चे डायरेक्टर प्रोफेसर मोहसीन खान सर,सुपरवाइजर मॅडम समन फारुकी,प्रिसिंपल सेहरा सहोता मॅडम,जूनियर कॉलेज चे प्रभारी प्रोफेसर तोसिफ अहमद सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण करून करण्यात आली या नंतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सामुहिक नृत्य,वैयक्तिक नृत्य, समाज संदेश नाटिका,एकपत्री प्रयोग या सह विविध नृत्य सादर करण्यात आले या कला गुणा मुळे पालकांना व मान्यवरांना आनंद झाला,[ads id="ads2"]
सूत्रसंचालन शितल मेढे मॅडम,व फारिया मॅडम,यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रिन्सिपल सेहरा सहोता मॅडम यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.