शासन व रेडक्रॉस सोसायटी तर्फे तहसीलदार यांच्या हस्ते डोंगरकठोरा येथील आपदग्रस्तांना तात्काळ मदत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूची तथा संसाराची राख रांगोळी झाली असता या घटनेची दखल यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ घेऊन दोन्ही कुटुंबियांना महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे वतीने ‘आपद ग्रस्तांना मदत साहित्य वाटप प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन योजनेअंतर्गत मदतीचा हात दिला.[ads id="ads1"] 

           याबाबत माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथे दि.१० फेब्रुवारी रोजी येथील अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आणि त्यांचा संसार उध्वस्त झाला जीवनावश्यक वस्तू व रोख रोकड असे एकूण ६ लाखांच्या वर या दोघांचे नुकसान झाले. सदरील घटनेची तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ गांभीर्याने दखल घेत नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला.[ads id="ads2"] 

     सौ.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शासन स्तरावरील पाठपुराव्यामुळे इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी अनिल सरोदे व दगडू पाटील या कुटुंबियांची भेट घेऊन बादली,चटई,ताडपत्री, साड्या,हायजेनिक किट,भांडी सेट,मुलांचे कपडे,मच्छरदाणी व स्वेटर अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.तसेच अनिल सरोदे यांचे या आगीत महत्त्वाचे संपूर्ण कागदपत्रे जळाल्यामुळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी त्यांना रेशनकार्ड दिले.प्रसंगी माझ्या परीने शक्य होईल तितकी मदत देण्यात येईल व जास्तीत जास्त मदत मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.आपण लागलीच म्हणजे काल दि.१२ फेब्रुवारी सोमवार रोजीच जिल्हाधिकारी व व संबंधित अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच आपण ग्रस्त कुटूंबियांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्थांनी आर्थिक मदत जमा करण्याबाबत चर्चा केली ग्रामपंचायतीनेही मदत देण्याचे जाहीर केले असता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी देखील तहसील कार्यालया वतीने देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

        यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने मदतीचा हात म्हणून अनिल सरोदे व दगडू पाटील या कुटुंबियांना देण्यात आलेल्या संसार उपयोगी कीट बाबत गावकर्‍यांच्या वतीने कौतुक करण्यातआले.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्ती नुसार तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद 

यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाखाली आमच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबियांना मदत करून आम्हीही या योगदानात खारीचा वाट उचलला असल्याची भावना इंडियन रेडक्रॉस सोसायटी पीआरओ उज्ज्वला वर्मा यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी पीआरओ उज्ज्वला वर्मा यांच्यासह उपाध्यक्ष गाणी मेमन,चेअरमन विनोद बियाणी,रक्त केंद्र चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी,आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष साकला,ऑफिस अससिस्टन्ट मनोज वाणी,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,कोतवाल विजय आढाळे,ग्रामस्थ भोजराज पाटील,गंगाधर जावळे,योगेश ठोंबरे,दत्तू गुरव,रवींद्र पाटील,

संजय आढाळे,दुलचंद पाटील,

गणेश जावळे,ललित पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!