यावल नगरपरिषदेच्या निर्णयामुळे पात्रता आणि बौद्धिक क्षमता गेली खड्ड्यात
यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषद मालकीचे साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र,जलकुंभ इत्यादी महत्त्वाची यंत्रणा चालविणे व देखभाल करणे साठी ठेकेदारीच्या माध्यमातून मजुरांची नियुक्ती केली आली आहे या प्रक्रियेत संबंधित ठेकेदार,यावल नगरपालिका मुख्याधिकारी आपल्या सोयीनुसार मजुरांना बिले देऊन कारभार करीत असल्याने ही अति महत्त्वाची आरोग्य विषयक कामे करून घेताना नियुक्त मजुराची पात्रता, बौद्धिक क्षमता खड्ड्यात घालून यावल नगरपरिषद आर्थिक उलाढाल करीत असल्याने यावल शहरातील इतर पात्र ठेकेदार आणि मजूर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरिता पाणीपुरवठा यंत्रणातील मजूर पुरवठा (काम तत्त्वावर ) करणेबाबत यावल नगर परिषदेच्या मालकीचे साठवण तलाव चालविणे व देखभाल करणे इत्यादी,जलशुद्धीकरण केंद्र चालविणे व देखभाल करणे,शहरातील जल कुंभ सांभाळणे व शहरात पाणी वितरण करणे इत्यादी कामासाठी वार्षिक ई-निविदा २०२४ - २५ प्रथम वेळेला काढण्यात आली.निविदा बीड संख्या GEM/2024/B/4556165/31/1/2024 आहे बीड बंदची तारीख १२/२/२०२४ आणि बीड खुलण्याची / ओपन होण्याची तारीख सुद्धा १२/२/२०२४ होती आणि आहे तसेच बीड बंद होण्याची तारीख १८० दिवस दिलेली आहे.अशी प्रक्रिया यावल नगरपालिकेने राबवलेली असली तरी काही ठेकेदारांना या प्रक्रियेतून पद्धतशीरपणे डावलण्यात आल्याने ठेकेदारांसह त्यांच्या मजूर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
मागील वर्षी या कामांसंदर्भातील ठेकेदार हा पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील असल्याने मात्र टेंडर मध्ये नमूद काही कामाच्या ठिकाणी मजूर मात्र अनियमित हजर राहून काही मजूर हजर नसताना ( उटा वरून शेळ्या चार ) कामे करीत होते या मजुरांना शासकीय नियमानुसार रोज दिला गेला आहे का..? तसेच शासकीय मजुरीचा दर काय आणि मजूराला प्रत्यक्षात किती रोज दिला गेला..? याची खात्री आणि चौकशी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाने केली आहे किंवा नाही, जे मजूर वरील नमूद ठिकाणी काम करीत आहे त्यांची पात्रता आणि बौद्धिक क्षमता अटी शर्तीनुसार आहे किंवा नाही याबाबत यावल शहरात ठेकेदारी,मजूर वर्गात अनेक प्रश्न उपस्थित होत असून सर्व मजुरांचे जाब जबाब घेतल्यास वस्तुस्थिती लक्षात येईल असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.



