ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबीर बलवाडी येथे २५ जानेवारी मतदार दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी डॉ डी बी पाटील यांनी सर्वांनी मतदार यादीत आपल्या नांवाची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. यावेळी रासेयो विदयार्थी प्रतिनिधी दिपाशा गुरव हिने मतदार दिनानिमित्त शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एस बी पाटील यांनी केले. यावेळी डॉ एस बी पाटील, डॉ सौ रेखा पाटील उपस्थित होते
ऐनपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मार्फत बलवाडी येथे मतदार दिवस साजरा
रविवार, फेब्रुवारी ०४, २०२४


