रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आदिवासी कोळी महासंघ जळगाव तर्फे अनुसूचित जमाती टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी यांना कोणतीही अट न घालता एसटी प्रवर्गातील दाखले मिळावे असे निवेदन फैजपुर प्रांताधिकारी यांना देण्यात आले. [ads id="ads1"]
तसे पत्र माननीय अहवाल सचिव आदिवासी विभाग यांच्याकडे पत्रान्वये अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करताना, नियम 2003 नियम ३(४) मधील तरतुदीनुसार जर अर्जदाराकडे खंड क ते च मध्ये उल्लेख केलेला कोणताही एक किंवा अनेक दस्तावेज सादर करण्यास असमर्थ असेल तर, अशा प्रकरणे अर्जदार त्याबाबतची कारणे शपथपत्रात नमूद करून त्यास दाखला देण्याबाबत तरतूद असताना वरील जमातीच्या व्यक्तींना महसुली पुरावा 1950 च्या पूर्वीच्या नोंदीचा पुरावा सादर करा असा दाखला नाकारला जात आहे.[ads id="ads2"]
तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये( अनुसूचित जमातीची) शासनाकडे असलेल्या आकडेवारी मध्ये सर्वात मोठी संख्या या जमातीची आहे ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत या जमातीची आकडेवारी गृहीत धरून आरक्षण दिले जाते. तसेच आदिवासी विभागाच्या सर्व योजना वरील जमातीच्या गावामध्ये योजना राबविल्या जातात. असे असताना 2023 च्या नियमांमध्ये 1950 चा जमातीचा, किंवा वास्तव्याचा पुरावा अपेक्षित असताना सुद्धा इतर जमातींना कोणतेही पुराव्याची पूर्तता न करता त्यांना नामपात्र कागदपत्रांवर दाखला दिला जातो, सर्व जमातींना एक न्याय असताना त्याची अंमलबजावणी न करता वरील जमातीवर अन्याय होत आहे .तरी फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी 2003 च्या नियमाने सर्व जमातींना एकाच नियमाचा आधार घेऊन लवकरात लवकर दाखला देण्यात यावा, असे यावेळी आदिवासी कोळी महासंघ यांच्याकडून फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
त्या ठिकाणी उपस्थित कोडी बांधव संजय प्रल्हाद कांडेलकर जिल्हाध्यक्ष ,मनोहर पंडित कोळी जिल्हा महासचिव ,सुभाष सुखदेव सपकाळे जिल्हा कार्याध्यक्ष, योगेश्वर विश्वनाथ कोळी रावेर तालुका अध्यक्ष, कैलास गोविंदा तायडे शाखा कार्यकर्ता ,राहुल मुरलीधर कोळी शाखा सदस्य, संजय पुंडलिक कोळी शाखा सदस्य, ओम मोहन कोळी शाखा सदस्य ,संदीप तुकाराम महाले युवा अध्यक्ष, समाधान हरी कोळी शाखा सदस्य, गजानन बाबुराव कांडले शाखा सदस्य, रवींद्र छगन तायडे शाखा सदस्य ,सुनिता बाळू तायडे महिला जिल्हाध्यक्ष, यांच्यातर्फे त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले.


