सत्ताधारी गट पुरस्कृत सहकार पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवून विरोधी गट पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा ( विद्यमान काँग्रेस आमदार नेतृत्वाचा ) केला दारुण पराभव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल तालुका शेतकी संघाची पंचवार्षिक निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा यांचा पराभव

यावल ( सुरेश पाटील )

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणीत सहकारी पॅनलने म्हणजे भारतीय जनता पार्टीचे संकट मोचक मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भावी उमेदवार अमोलदादा जावळे यांच्या नियोजनबद्ध प्रचार निवडणूक कार्यक्रमामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ( आमदार शिरीषदादा चौधरी ) आणि महाविकास आघाडी प्रणित शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला.[ads id="ads1"] 

      यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष तथा विद्यमान संचालक प्रभाकर आप्पा सोनवणे चेअरमन अमोल भिरुड,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देवकांत पाटील, नीलिमा चेतन किरंगे,अनिता हेमंत येवले,सतीश हरिचंद्र पाटील,यांचा पराभव कशामुळे झाला याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.[ads id="ads2"] 

        पंचवार्षिक निवडणूकीत एकूण १७ जागांपैकी १६ जागावर भाजप शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी रिपाई आठवले गट प्रणित सहकारी पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दारुण पराभव करून त्यांच्या राजकारणाचे १२ वाजविले.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अतुल वसंतराव पाटील यांच्या माध्यमातून व त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागेल यात मात्र महाविकास आघाडीचा गड गेला ( प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून ) पण सिंह आला अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.

        भाजप,शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट ) रिपाई आठवले गट प्रणित सहकार पॅनलने १७ पैकी १६ जागा जरी प्राप्त केल्या असल्या तरी महाविकास आघाडी प्रणित शेतकरी पॅनलचे एकमेव निवडून आलेले संचालक तथा यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांच्या बौद्धिक व राजकीय कौशल्यमुळे १६ नवनिर्वाचित संचालकांना शेतकी संघात काही निर्णय घेताना चांगलाच संघर्ष करावा लागणार असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

       यावल तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत महायुतीचे नारायण शशिकांत चौधरी हे एक प्रबळ आणि समर्थ उमेदवार प्रचार रणधुमाळीच्या आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.उर्वरित १६ जागांसाठी काल  रविवार दि. ४ रोजी मतदान घेण्यात आले होते. यात महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास आणि महायुतीचे सहकार या दोन्ही पॅनलचे एकुण ३२ इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.यासाठी दि. ४ फेब्रुवारी रोजी माध्यमिक कन्या शाळेत व्यक्तीशः मतदारसंघात ६६ टक्के मतदान झाले होते. २ हजार ८२५ पैकी १८६९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

       आज येथील महर्षी श्री व्यास महर्षी मंदीराच्या सभागृहात मतमोजणीस सुरूवात झाली.यात महायुतीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.यामुळे येथील मविआ प्रणीत पॅनलची सत्ता जाऊन महायुतीचे पॅनल सत्तारूढ झाले आहे.लक्षणीय बाब म्हणजे सहकारी पॅनलच्या १५ आणि आधी एक बिनविरोध झाल्याने एकूण १६ जागा निवडून आल्या असून विरोधकांमध्ये फक्त माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना तोही त्यांच्या बौद्धिक व राजकीय कौशल्यावर विजय मिळाला.इतर संचालकांना संधी का मिळाली नाही..? याचे राजकीय,सामाजिक संशोधन करणे गरजेचे आहे अन्य काही उमेदवारांचा दारूण पराभव का..? झाला याचे सुद्धा आत्मचिंतन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे.

    आजच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने सर्व जागांवर विजय मिळविला असला तरी मविआच्या पॅनलचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला ( निवडणुकीत आर्थिक उलाढाल आणि फुली काय चालली..? तो भाग वेगळा ) तर शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सर्वाधीक मते मिळवून आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.

          महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे,आ. शिरीषदादा चौधरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अतुल पाटील आदी मान्यवरांनी केलेले प्रयत्न फोल ठरले.तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून मविआला जबरदस्त धक्का दिला आहे.यातून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे चित्र सुद्धा स्पष्ट झाल्याचे यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

-----------------------------------------------

यावल तालुक्यातअजित पवार गटाचे उघडले खाते..

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तथा जिल्हा बँक माजी संचालक यावल तालुका शेतकरी संघाचे माजी संचालक प्रशांत लीलाधर चौधरी यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सहकार क्षेत्रात खाते उघडल्याने सोयीनुसार राजकारण करणारे आणि तळ्यात मळ्यात उडी मारणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मात्र मोठी चपराक बसली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!