पोलीस आणि जिल्हा उपनिबंधक यांचे दुर्लक्ष
यावल ( सुरेश पाटील )
यावल शहरात बेकायदा कोट्यावधी रुपयाच्या भिसी प्रकरणात दर आठवड्याला, १५ दिवसाआड आणि प्रत्येक महिन्याला बेकायदा कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्याने यात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या व्यापारी वर्गाकडून व धन दांड्यांकडून आर्थिक शोषण होत व दमदाटी केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावल शहरात अनेक ठिकाणी २५ हजारापासून २५ लाखा पर्यंतच्या भरणा असलेल्या भिसिचा बेकायदा उद्योग महसूल पोलीस आणि सहकार विभागाच्या नाकावर टिचून बिनधास्तपणे सुरू आहे याकडे पोलिसांच्या गोपनीय विभागाचे लक्ष नसल्याने किंवा त्यांना समजून येत नसल्याने समाजात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
भिसी मध्ये सहभागी गरजवंतांनी लिलावाची भिशी घेतल्यानंतर पाशीक, साप्ताहिक किंवा मासिक हप्ता न भरला गेलास भिसी चालवणारा प्रमुखास काही धन दांडगे गब्बर दमदाटी,बदनामी, मारहाण करण्याची धमकी देत असल्याने यावल शहरातील आर्थिक अडचणीत असलेले तीन-चार जण पैसे मागणाऱ्यांच्या भीतीने फरार झाले असून काही जण आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत.
संपूर्ण यावल शहरात ठीक ठिकाणी बेकायदा भिसी उद्योगात अंदाजे ४०० ते ५०० गरजू नागरिकांना सहभागी करून काही शेती खरेदी विक्री करणारे दलाल,राजकारणाशी संबंधित काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उद्योग व्यवसायातील काही ठराविक जनरल वस्तू व सोन्या-चांदीच्या व्यवहाराशी काही संबंधित व्यापारी मात्र आपला हेतू साध्य करण्यासाठी भिसी प्रकरणात दादागिरी दमदाटी गुंडगिरी करीत असल्याने यावल शहरातील काही भिशीतील सदस्य फरार झाले असून काहींना दमदाटी व बदनामी करण्याची धमकी दिली जात असल्याने तीन-चार जण आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत या गंभीर तसेच हार्दिक शोषण करणाऱ्या महाठगांकडे जिल्हाधिकारी जळगाव सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक जळगाव फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून तात्काळ कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.[ads id="ads2"]
यावल शहरातील भिशी प्रकरण जिल्हास्तरावर संबंधित विभागाकडे व्हिडिओ क्लिप रेकॉर्डिंग छायाचित्रणासह दाखल झाले असून यावल शहरातील काही दलाल प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे नावे समोर येत असल्याने,येत्या २४ तासात त्यांचे मोबाईल वरील संभाषण दमदाटी कशाप्रकारे होत आहे याची खात्री करून त्यांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यावल पोलीस स्टेशन हद्दीत काल सोमवार दि.५ चे रात्री एका मद्य प्राशन करण्याच्या ठिकाणी हॉटेलात २ / ३ जणा मध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याने एक जण जबर जखमी होऊन त्याच्या डोक्याला काही टाके पडल्याचे वृत्त सुद्धा असल्याने ही गंभीर घटना पोलीस स्टेशन पर्यंत न गेल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वरील बेकायदा व्यवहाराबाबत जिल्हाधिकारी यांना आज प्रत्यक्ष लेखी निवेदन दिले जाणार असल्याचे सुद्धा निश्चित झाले आहे.


