ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे दोन गटात वाद निर्माण झाल्यामुळे दगडफेक झाली तात्काळ दंगा पथकास पाचारण करण्यात आले परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच ते सहा लोक जखमी झाले आहेत.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी दहा वाजता बस स्थानक परिसरात दोन गटात युवकांमध्ये वाद निर्माण झाला त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन नंतर दगडफेकीत रूपांतर झाले दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने वातावरण काहीसे भीतीचे झाल्यामुळे दुकाने ताबडतोब बंद करण्यात आली तसेच सकाळची वेळ शाळा भरण्याची असल्यामुळे पालकांमध्ये व मुलांमध्ये सुद्धा भितीचे वातावरण होते. शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर सुद्धा परिणाम झाला. शाळा लवकर सोडण्यात आली.[ads id="ads2"]
तत्काळ निंभोरा , रावेर, सावदा वरणगाव फैजपूर येथून पोलिसांचे पथक गावात आले तसेच एस आर पी जवान व दंगा नियंत्रण पथक गावात जमा झाले व तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली .दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच ते सात लोक जखमी झाल्यामुळे त्यांना रावेर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सुद्धा तात्काळ गावात दाखल झाले त्यांनी या भागात दगडफेक झाली त्या भागाची पाहणी केली व फैजपूर येथील डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह मॅडम यांना परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश दिला.आज पासून सरदार वल्लभाई पटेल विद्यालयात दहावीचे तोंडी परीक्षा असल्यामुळे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उपस्थिती काहीशी कमी होती कारण पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये भीती होती तसेच दुपारचे बॅचेस सुद्धा परीक्षेचे रद्द करण्यात आले शाळा लवकर सोडून देण्यात आली. पोलीस उपाधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे संध्याकाळपर्यंत दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात आले असून जखमी झालेल्या पोलिसांकडून सुद्धा दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येणार असून जे लोक या दगडफेकीत सहभागी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येईल असे अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग , प्रांत देवयानी यादव, तहसीलदार बी.ए. कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि हरिदास बोचरे , वरणगांव येथील पोलीस निरिक्षक किशोर पाटील ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील, सरपंच अमोल महाजन, मंडळ अधिकारी जी.एन.शेलकर तलाठी शरद सूर्यवंशी, पोलीस पाटील दिपाली तायडे घटना स्थळी उपस्थित होते.
आनंद बाविस्कर संस्थापक निळे निशान सामाजिक संघटना,शमीभाताई पाटील वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ,धुमा तायडे, सावंत मेढे, लक्ष्मीबाई मेढे आदींनी घटना स्थळी भेट दिली . गावात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन विविध संघटना मार्फत करण्यात आले.


