यावल (सुरेश पाटील) : रविवार दि.११ रोजी रात्री १० वाजेचे सुमारास यावल येथे चोपडा रोडवर यावल सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे समोर बेकायदा वाळू वाहतूक करणारे डंपर यावल पोलिसांनी पकडून गुन्हा दाखल केला.[ads id="ads1"]
यावल पो.कॉ.अनिल रमेश पाटील यांनी फिर्याद दिली की वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील आरोपी दिपक ज्ञानेश्वर सोळंके वय २५ याने २१:३० वा.च्या सुमारास यावल येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर रोडवर सार्व जागी ४ लाख रुपये किंमतीचे एक अशोक लेलैन्ड कंपणीचे डंपर क्र. MH-19-CY-9858 मध्ये९ हजार रुपये किमतीची अंदाजे २ ब्रास वाळु भरलेली आणि बेकायदा वाहतूक करीत असताना आढळून आल्याने यावल पोलीस स्टेशनला वाळूचे डंपर जमा केले.[ads id="ads2"]
व याबाबत वाळू चोरीचा गुन्हा भाग ५ गुन्हा नं.३२/२०२४ भादवी ३७९ गौण खनिज कायदा कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याची माहिती पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसीलदार यांना सुद्धा देण्यात आल्याचे समजले.गुन्हाचा पुढील तपास सपोनि हर्षल भोये यांच्या आदेशान्वये यावल पोलीस करीत आहेत.


